कधीकधी मनात खूप काही साठलेलं असतं, आणि तेच लिहावंसं पण वाटतं, पण, मन कुठल्या गुंत्यात गुंतलेलं असतं कळतच नाही मला, लिहायला बसतो तर, पेन पुढे वळत नाही, कागदावर पेन आणि शब्दांचा मेळ चं जुळत नाही. मनात काहूर माजलेला असतो तेव्हा शब्द पण आठवतात, पण ओळ च पूर्ण होत नाही, शेवटी ठेवतो बाजूला पेन आणि डायरी बसतो हनुवटीवर हात ठेवून, एकटाच विचार करत, असं का होते? हेच कळत नाही.... प्रीत