सांजवेळी मनात माझ्या दाटुनी आल्या जुन्या आठवणी भातुकलीच्या खेळामध्ये आपण दोघे राजा राणी भातुकलीच्या खेळामध्ये संसार होता थाटला दोघांनाही भानच नव्हते हा तर खेळ आहे आपला खोटे खोटे राजा राणी एकदिवस दूर दूर ते झाले जाता जाता एकमेकांच्या डोळ्यात पाणी ठेऊन गेले डाव मोडला भातुकलीचा उरल्या फक्त आठवणी सांजवेळी आठवली मज जुनी प्रेम कहाणी ------------------------------- #सांजवेळी# मराठी कविता#