Nojoto: Largest Storytelling Platform

श्री स्वामी समर्थ माझ्या द्वारी येऊनी बसले क्षणभ

श्री स्वामी समर्थ 

माझ्या द्वारी येऊनी बसले क्षणभर
अन् हसले माझे सद्गुरू श्री स्वामी
आयुष्याची ज्योत सदा तेवते माझी त्यांच्यामुळे
असे माझे कृपाळकेशव श्री स्वामी समर्थ

अनाहुत असाच मी मनाच्या हिंदोळ्यावर 
जेव्हा गात बैसलो स्वामीमय अभंगवाणी
गाता गाता हर क्षणाक्षणाला 
पाही देव तो मी माझ्या अंतर्यामी  

मंद मंद पवनाच्या त्या लहरी
प्रसन्न करिती सदा जिवितास भारी 
अनुभव घेतो तेव्हा मी दैवी सुखाचा 
मनात आनंदाच्या येती ऊर्मी 

निळ्या नभाला बिलगून खाली
नक्षत्रांची ती दिसली स्वामीकृतनगरी
त्या ठायीच्या उंबऱ्यात बैसोनी घेतले 
तृप्तीचे मी हर क्षण दान पदरी 
तेजोमय गुरू प्रकट जाहले
झालो तयांच्या दर्शनाने मी कृतार्थ
असे दिव्यतेजललाटसंपन्न आहेत
माझे गुरूराया कृपाळकेशव श्री स्वामी समर्थ

©शब्दवेडा किशोर #श्री_स्वामी_समर्थ
श्री स्वामी समर्थ 

माझ्या द्वारी येऊनी बसले क्षणभर
अन् हसले माझे सद्गुरू श्री स्वामी
आयुष्याची ज्योत सदा तेवते माझी त्यांच्यामुळे
असे माझे कृपाळकेशव श्री स्वामी समर्थ

अनाहुत असाच मी मनाच्या हिंदोळ्यावर 
जेव्हा गात बैसलो स्वामीमय अभंगवाणी
गाता गाता हर क्षणाक्षणाला 
पाही देव तो मी माझ्या अंतर्यामी  

मंद मंद पवनाच्या त्या लहरी
प्रसन्न करिती सदा जिवितास भारी 
अनुभव घेतो तेव्हा मी दैवी सुखाचा 
मनात आनंदाच्या येती ऊर्मी 

निळ्या नभाला बिलगून खाली
नक्षत्रांची ती दिसली स्वामीकृतनगरी
त्या ठायीच्या उंबऱ्यात बैसोनी घेतले 
तृप्तीचे मी हर क्षण दान पदरी 
तेजोमय गुरू प्रकट जाहले
झालो तयांच्या दर्शनाने मी कृतार्थ
असे दिव्यतेजललाटसंपन्न आहेत
माझे गुरूराया कृपाळकेशव श्री स्वामी समर्थ

©शब्दवेडा किशोर #श्री_स्वामी_समर्थ