Nojoto: Largest Storytelling Platform

#माहेरची वाट कुणीच नाही राहिलं आईबापाच्या माघारी प

#माहेरची वाट
कुणीच नाही राहिलं आईबापाच्या माघारी
पडलं ते घर अन् ओस पडली ती प्रेम नगरी
होतं चिमणा चिमणीचं घर, होता पिल्लांचा गोतवळा
सुखी संसाराचा ठेवा होता त्यांनीच जमवलेला
आली पावसाची धार आला सोसाटयाचा वारा
क्षणात चिमणा चिमणीचा गेला उडून निवारा
आई माझी मायाळू भावासंगे गोतवळा
बाप माझा होता दयाळू संपला सारा जिव्हाळा
ओवाळणीचं ताट गं आता सूनं सूनचं राहिलं
रक्षाबंधनाची आसही आता मनातचं पाहिलं
कुणीच नाही त्या स्थळी वाट झाली अवघडलेली
दगड धोंडे तिथं पसरलेली चिखल मातीत न्हाली
सहानुभूतीचे शब्द उरलेल्या नात्यांच्या लोकांचे जीव्हारी लागले
नाही आधीसारखा आपलेपणा तयात शब्द झुल्यात लटकले
येई मातीतून आवाज छबी दडली चिखलात
नाही दिसत ती नगरी कशी जाऊ माहेरात
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #माहेरचीआठवण