Nojoto: Largest Storytelling Platform

सूर सुने, शब्द मुके, तरीही गुणगुणते गीत माझे मुक्

सूर सुने, शब्द मुके, तरीही
 गुणगुणते गीत माझे
मुक्त जरी दाही दिशा
का मग पाऊल अडते ?
बांध फुटे डोळ्यांचा 
सल का आतून दडते
मोरपिशी याद कधी 
तुला ही स्पर्शून जाते ?
पाय तुझा पाऊल मी 
गाव कसे गाठावे
क्षितिज जसे दूर 
तुला क्षितिजच मी मानावे
ओघळता आसू तुझा 
चिंबचिंब मी व्हावे
सांग मला काय कसे 
अपुले हळवे नाते
मोरपिशी याद कधी 
तुला ही स्पर्शून जाते ?
©️ Swapnil Jadhav
#Pennings
#Swapys_Diaries #Belief 
#Pennings 
#Swapys_Diaries
#Love_For_Words
सूर सुने, शब्द मुके, तरीही
 गुणगुणते गीत माझे
मुक्त जरी दाही दिशा
का मग पाऊल अडते ?
बांध फुटे डोळ्यांचा 
सल का आतून दडते
मोरपिशी याद कधी 
तुला ही स्पर्शून जाते ?
पाय तुझा पाऊल मी 
गाव कसे गाठावे
क्षितिज जसे दूर 
तुला क्षितिजच मी मानावे
ओघळता आसू तुझा 
चिंबचिंब मी व्हावे
सांग मला काय कसे 
अपुले हळवे नाते
मोरपिशी याद कधी 
तुला ही स्पर्शून जाते ?
©️ Swapnil Jadhav
#Pennings
#Swapys_Diaries #Belief 
#Pennings 
#Swapys_Diaries
#Love_For_Words