Nojoto: Largest Storytelling Platform

#बा विठ्ठला.... विठ्ठला तुझे नाम असे सदा माझीया ओठ

#बा विठ्ठला....
विठ्ठला तुझे नाम असे सदा माझीया ओठावरी
करतोया वारी मी तुझी नित्यनेमे
वैष्णवांचा मेळा धरी पंढरीची वाट
अवघड घाटपंथ ते एक साथ चालतसे 
घरदाराचा करूनीया त्याग घेऊनीया डोईव तुळस
मनी फक्त तुझ्या भेटीचीया असे साऱ्या वारकऱ्यांना आस
दिंड्या पताका येता पंढरपुरी पावसाच्या सरी तु स्वागतास अंथरतो
सावळे हे रूप अन् तुझ्या भक्तीचा तो
अनुपम सोहळा पाहुनिया डोळा मी तुझा वारकरी सुखावतो
ठेवुनीया मनी देवा तुझे सत्व घेई मी हाती 
हरीभक्तसंप्रदायाची ही पताका ज्ञाना एकनाथास पुजियेतो
माझी पाऊले चालती पंढरीची वाट तया पंढरी नगरीत तुझा मोठा थाट
आम्ही वारकरी पायी करी तुझी वारी भक्तीसवे असे अंतरी आमुच्या भोळाभाव
हाती घेऊनीया टाळ चिपळ्या अन् मृदुंग राही सदा बा विठ्ठला आम्ही तुझ्या भजनात दंग
वेड लागे देवा आमच्या जीवा येतो तुझ्या दारी तुझ्या नामघोषात रंगे तुझा वारकरी
रानावनात विठ्ठल पानाफुलावेलीत विठ्ठल विठ्ठल बोले फुल फुल
चराचरी लावुनिया मस्तकी तुझ्या नावाचा रे चंदनाचा टिळा
भक्तीचा हा तुझ्या असे सोहळा
ज्ञानदेव पाया तुकोबा असे कळस वारीचा सायास खेळ मांडीयेला
संसारी थकलो प्रपंच निरर्थ करू परमार्थ होई मग मोक्षप्राप्ती
जन्मास येऊन साधावी ती वारी विठुराया तारी असे भक्तालागी
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #गुरूपोर्णिमा
#बा_विठ्ठला