Nojoto: Largest Storytelling Platform

माणसासारखेच पावसाचे थेंब(लेख👇) काल रात्री धो-धो प

माणसासारखेच पावसाचे थेंब(लेख👇) काल रात्री धो-धो पाऊस बरसत होता.पावसाची गाज निराळीच होती. ती गाज मला चिंब भिजून जाण्यासाठी साद घालत होती.खिडकीतून पावसाला बरसताना मी मनसोक्त पाहत होते.मनातून मी चिंब भिजून गेले होते.बघता बघता माझ्या घरची खिडकीची काच पाऊस सरींच्या थेंबांनी पार चिंब भिजून गेली.

पावसाला मन भरून पाहताना त्या थेंबांनी मला आपलंसं केलं.त्यातले काही थेंब "जाऊ दे ना यार" म्हणून पुढे जाणारे होते अन् काही थेंबांचा जणू पुतळा झाला होता, त्या थेंबांनी तिथेच स्वतःला रोखून ठेवले होते.या थेंबांचं असं वागणं मला अगदी माणसांसारखं वाटलं.आपण नाही का, एखादी घटना घडली की त्याच घटनेला गोंदासारखं चिकटून राहतो.त्या घटनेतून पुढे जाण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते सहजासहजी शक्य होत नाही.मग काळ नावाचं औषध आपल्या मदतीला धावून येतं आपल्यासाठी.आपल्याला त्यातून बरोबर सही सलामत बाहेर काढून आपल्याला पूर्वीसारखं ठणठणीत बरं करतं. 
 
काही थेंब खिडकीच्या काचेवरून भरभर ओघळून जाणारे होते.त्यांना त्या घटनेशी काही घेणं देणं नसतं किंवा मग त्यांना दुःख झालेलं नसतं अशातला भाग नसेल.कदाचित ह्या थेंबांना आपल्या दुःखाचा गाजावाजा करता येत नसावा.त्यांना बहुतेक भविष्यात काय दडलंय हे जाणून घेण्याची उत्सुकता असावी.
--प्रेरणा

#marathiquotes #yqtaai #yqthoughts #yqdidi #yqbaba #yqdiary