ह्यांना विचारा जेवणाची किंमत, ज्यांना पोट भरण्यासाठी स्मशान सुद्धा हॉटेल वाटते. कारण, ज्यांना सहज अन्न मिळते त्यांना त्याची कदर राहात नाही, हे नको -ते नको, इथं नको -तिथं नको, तेराव्याचं जमत नाही, बारश्याचं जमत नाही, ह्याच्या हाथाचं नको, त्याच्या हातचे नको, असे बहाणे करून, अन्नाची फेकाफेकी करतात. ज्याला एकवेळचे अन्न सुद्धा नशीब होत नाही त्याला जेवणासाठी स्मशान काय नि हॉटेल काय? भुकेपुढे महालातली चव सुद्धा स्मशानातल्या चवीपुढे फिकी पडते.. म्हणून कदर करा.. कदर