Nojoto: Largest Storytelling Platform

बाप एक देव असतो.. मुलांच्या जन्माआधी पासुन त्यांच्

बाप एक देव असतो..
मुलांच्या जन्माआधी पासुन त्यांच्या भविष्याची काळजी करणारा बाप असतो..
कुटुंबाचे पोट भरण्यासाठी रक्ताचे पाणी करणारा बाप असतो..
सुखात मागे तर दुःखांत सर्वात पुढे उभा राहणारा बाप असतो..
न मागता सर्व गोष्टी पुरवणारा, न दर्शवता नितांत प्रेम करणारा बाप असतो..
खचलेल्या आईला आधार देणारा, तीच्यासोबत प्रत्येक प्रसंगात सोबत राहणारा बाप असतो..
मुलांच्या सुखासाठी दुसर्‍यांसमोर हात जोडणारा बाप असतो..
आजारपण अंगावर काढत मुलांचे हट्ट पुरवणारा बाप असतो..
वयाचा विचार न करता नातवांसाठी घोडा बनणारा, त्यांच्यासोबत लहान मुलांसारखा खेळणारा हा एक बाप असतो..
निवृत्तीनंतरही घराची कामे करण्यात आनंद मानणारा बाप असतो..
खरच आईप्रमाणे बाप पण एक देव असतो.. खरज बाप एक देव असतो...
#marathiquotes #marathi #fatherlove #fathertaughtme #youquotetai