आपले पाहिले वर्ग नेहमी पाऊसासोबतच भरायचे! पहिल्यांदा तुला पाहिलं.. तेव्हा तू छत्री विसरली होतीस कदाचित कारण वर्गात आलीस तेव्हा ओलेचिंब झाली होतीस.. मी मात्र तेव्हा तुझ्या त्या सोंदर्याने अंगभर भिजून गेलो.. त्यानंतर तासन्तास तुझ्याकडे पाहत मग्न होऊन जायचो वर्गाबाहेर कोसळणाऱ्या त्या पावसासारखाच..!! मात्र यावेळी तुलाही वीजेसारखं मधेमधे चमकताना पाहिलं होतं... नेहमीप्रमाणे वर्ग भरले होते.. तुला उशीर झाला होता पाऊसामुळेच बहुतेक! माझा जीव तू येण्याच्या वाटेवर अडकून छत्रीत होता.. तू घाईत वर्गाकडे जायला निघाली होतीस.. तुला छत्रीतला मी दिसलोच नव्हतो! पुढे तू अचानक थांबलीस मी तुझ्याजवळ आलो.. मी तुझ्या डोळ्यांत पाहिलं दुसऱ्या क्षणी गुडघ्यावर बसलो.. तुझ्या चप्पलचा निसटलेला बंध बसवू लागलो! मी भिजतोय हे पाहून तू तुझी छत्री माझ्या बाजूला तिरकी करत मला तुझ्या छत्रीत घेतलंस.. आपण दोघेही तुझ्याच छत्रीत वऱ्हांड्यात येऊन थांबलो! तू तुझी छत्री मिटत वर्गात निघून गेलीस.. मी वऱ्हांड्यात उभा मला छत्रीत येऊनही ओलेचिंब भासत होतो आपण थांबलेल्या ठिकाणी मागे वळून पाहिलं तर.. तिथेच माझी ती मिटलेली छत्री दवबिंदूनी बहरली होती!! ~ कुमार भोसले ©️कुमारचित्र #तुला छत्रीतला मी दिसलोच नव्हतो!!