Nojoto: Largest Storytelling Platform

स्कंदमाता स्तुती ममतामयी जगदंबा पुत्र तुझा सेनापत

स्कंदमाता स्तुती

ममतामयी जगदंबा
पुत्र तुझा सेनापती l
त्याची तू कार्तिकेय माता 
तूच स्कंदमाता आदिशक्ती ll१ll

चतुर्भुज धारिणी 
निर्भया सिंह तुझे वाहन l
पद्मासना देवी तू
भक्ता शक्ती देई संचालन ll२ll

बालक स्कंद एका हातात
कमल पुष्प दोन हाती l
एका हस्ते वरद मुद्रा
तव कृपा देई शुभदा शांती ll३ll

शृंगार तुला अति प्रिय
हिरवा चुडा आवडतो l
पिवळ्या वस्तू प्रिय तुला
साज तुला शोभतो ll४ll

शुभ्र तुझे वर्ण
नयन तुझे लोभस l
सूर्य मंडल अधिष्ठात्री देवी
तू अलौकिक आणि तेजस ll५ll

तुझ्याच कृपेने कालिदासाने
रचले रघुवंशम् महाकाव्य l
मेघदूत रचना साकार
कृपादृष्टी तुझी ग भव्य ll६ll

✍️ प्रियंका सोनवणे
स्कंदमाता स्तुती

ममतामयी जगदंबा
पुत्र तुझा सेनापती l
त्याची तू कार्तिकेय माता 
तूच स्कंदमाता आदिशक्ती ll१ll

चतुर्भुज धारिणी 
निर्भया सिंह तुझे वाहन l
पद्मासना देवी तू
भक्ता शक्ती देई संचालन ll२ll

बालक स्कंद एका हातात
कमल पुष्प दोन हाती l
एका हस्ते वरद मुद्रा
तव कृपा देई शुभदा शांती ll३ll

शृंगार तुला अति प्रिय
हिरवा चुडा आवडतो l
पिवळ्या वस्तू प्रिय तुला
साज तुला शोभतो ll४ll

शुभ्र तुझे वर्ण
नयन तुझे लोभस l
सूर्य मंडल अधिष्ठात्री देवी
तू अलौकिक आणि तेजस ll५ll

तुझ्याच कृपेने कालिदासाने
रचले रघुवंशम् महाकाव्य l
मेघदूत रचना साकार
कृपादृष्टी तुझी ग भव्य ll६ll

✍️ प्रियंका सोनवणे
nojotouser2798374052

priyanka

New Creator