Nojoto: Largest Storytelling Platform

#अंश त्या विश्वस्वरूपाचा.... जगावेगळा तो एक याचक अ

#अंश त्या विश्वस्वरूपाचा....
जगावेगळा तो एक याचक अन् जगावेगळा तयाचा धनी
मुठभर पोह्यासाठी दिली याचकास त्या का सुवर्ण नगरी कुणी
बालमित्र दारात अवघडे असे तयाची कटी कौपिन फाटकी
मुठभर पोह्याच्या प्रेमाने धन्य होई तयाच्या विश्वरूपी धन्याची कनवटी
भेटाया भक्तास धावतसे सदा तो त्रैलोक्याचा विश्वस्वरूप धनी
नसे तयाच्या भक्तप्रेमास उपमा दुजी या जनी
भक्तासाठी येई तो जनार्दन झडकरी सवे घेऊनी सोळा सहस्त्र सर्वालंकार
अन् असे सेवेला सादर तत्पर
वस्त्राभरणे अन पक्वान्ने उणे नसे तयालागी तिळभर
भक्तीला भगवंत घालतो मायेची अशी आगळीवेगळी गवसणी
सुवर्ण नगरी दिली बांधुनी मित्र प्रेम जाणुनी
परंतु माया पाश घेतले मात्र निघताना काढुनी
माया सरता तो भक्त राहिला तया विश्वरूपाठायी ब्रह्मस्वरूप अंश होऊनी
मुठभर पोह्यासाठी दिली का सुवर्णनगरी कुणी......
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #जय_श्री_राधे_कृष्णा