Nojoto: Largest Storytelling Platform

*पाऊस बोलून गेला..* सो सो करीत वारा *सुटला,* लपा

*पाऊस बोलून गेला..*


सो सो करीत
वारा *सुटला,*
लपाछपीचा खेळ
ढगात *रंगला.*

थुई थुई करत
पाऊस *पडला,*
हळूच माझ्या
कानात *बोलला.*

माझ्यात भिजूनी
कोरडा *राहिला,*
असा कसा रे
तू मला *घाबरला.?*

म्हातारी आजी
दळण *भरडते,*
गडगड करुनी
साऱ्यांना *घाबरवते.*

उरात माझ्या 
वीजच *भरली,*
ढगांच्या आडुन
खुदकन *हसली.*

 नाचत पळत
धावत *सुटलो,*
पाऊस बोलला
गोधडीत *शिरलो.*
--------------------
✍️ राजेंद्रकुमार शेळके.
  -- नारायणगाव, पुणे

©Rajendrakumar Shelke बालगीत
*पाऊस बोलून गेला..*


सो सो करीत
वारा *सुटला,*
लपाछपीचा खेळ
ढगात *रंगला.*

थुई थुई करत
पाऊस *पडला,*
हळूच माझ्या
कानात *बोलला.*

माझ्यात भिजूनी
कोरडा *राहिला,*
असा कसा रे
तू मला *घाबरला.?*

म्हातारी आजी
दळण *भरडते,*
गडगड करुनी
साऱ्यांना *घाबरवते.*

उरात माझ्या 
वीजच *भरली,*
ढगांच्या आडुन
खुदकन *हसली.*

 नाचत पळत
धावत *सुटलो,*
पाऊस बोलला
गोधडीत *शिरलो.*
--------------------
✍️ राजेंद्रकुमार शेळके.
  -- नारायणगाव, पुणे

©Rajendrakumar Shelke बालगीत

बालगीत #Comedy