Nojoto: Largest Storytelling Platform

आठवणींनी मोहरले क्षण देहाचे मग फुलले कण कण किती झ

आठवणींनी मोहरले क्षण
देहाचे मग फुलले कण कण

किती झेलल्या श्रावणधारा 
ढळून गेला श्रावणही पण

करशिल जेव्हा प्रेम कुणावर 
कळेल तेव्हा तुला समर्पण

जेव्हा जेव्हा तुला पाहिले 
तेव्हा तेव्हा गळले 'मी' पण

या रोगाचे काय करू मी
तुझा भास अन् नामोच्चारण 

डोळ्यांमध्ये तुझ्या पाहते
हवे कशाला कुठले दर्पण 

अशी वाढवू लज्जत आपण
तू पोळी मी त्यातिल सारण

16/02/2023

©Sujata Darekar 
  # feeling romantic

# feeling romantic #Shayari

447 Views