Nojoto: Largest Storytelling Platform

पडक्या भिंती पडक्या भिंतींनाही आहे अजुनी ओलावा मा

पडक्या भिंती

पडक्या भिंतींनाही आहे
अजुनी ओलावा मायेचा
पाहता काळीज तुटत जाते
आवाज येतो आईच्या हाकेचा

गावाकडची मातीच न्यारी
हृदयांना घट्ट सांधणारी
नसेल कुठले नाते तरीही
आपुलकीने मने बांधणारी

सय आजीच्या गोधडीची
हवासा खजिना गोष्टीचा
खाऊ देताना माझ्यासाठी
थरथरणारा हात मायेचा

आठवते हिवाळ्यातली आगटी
गप्पांचा फड उभारणारी
आणि उब आईच्या कुशीची
वत्सलतेने मज बिलगणारी

आधारवड माझ्या बाबांचा
घराचा डोलारा तोलणारा
क्षणोक्षणी आठवत रहातो
पाठीवर हात फिरणारा 

पाहता पडकी भिंत आजही
दृश्यपट तो उभा राहतो
एकेकाळच्या नंदनवनाची
आजही तो साक्ष देतो #nojoto#nojotoapp#nojotomarathi#marathikvita#nojotopoem#nojotohindi#nojotonews#nojotobestpoetry
पडक्या भिंती

पडक्या भिंतींनाही आहे
अजुनी ओलावा मायेचा
पाहता काळीज तुटत जाते
आवाज येतो आईच्या हाकेचा

गावाकडची मातीच न्यारी
हृदयांना घट्ट सांधणारी
नसेल कुठले नाते तरीही
आपुलकीने मने बांधणारी

सय आजीच्या गोधडीची
हवासा खजिना गोष्टीचा
खाऊ देताना माझ्यासाठी
थरथरणारा हात मायेचा

आठवते हिवाळ्यातली आगटी
गप्पांचा फड उभारणारी
आणि उब आईच्या कुशीची
वत्सलतेने मज बिलगणारी

आधारवड माझ्या बाबांचा
घराचा डोलारा तोलणारा
क्षणोक्षणी आठवत रहातो
पाठीवर हात फिरणारा 

पाहता पडकी भिंत आजही
दृश्यपट तो उभा राहतो
एकेकाळच्या नंदनवनाची
आजही तो साक्ष देतो #nojoto#nojotoapp#nojotomarathi#marathikvita#nojotopoem#nojotohindi#nojotonews#nojotobestpoetry