Nojoto: Largest Storytelling Platform

सांजवेळ रोज यावी, प्रेम बहरली सांजवेळ स्पर्शात क

सांजवेळ 

रोज यावी, प्रेम बहरली सांजवेळ
स्पर्शात कोमलश्या, घेऊन गोडवा
आतूर भेटीची, वेळ अशी अनोखी 
पाहून लाजली दिशा, योग घडावा  ||१||

झुळूक गारव्याची मंतरलेली अन् 
काया नवथर, त्यांत थरथरलेली 
मने दोघांची होती पुन्हा बावरलेली 
सांजवेळ ही पुनवेची होती सजलेली  ||२||

किलबिल पाखरांची घरट्याशी सुरू 
दोन पाखरे मुकीच उभी झाडाखाली
झरझर क्षणात सरून जाते निशा 
दोन आसवांनी नाती भिजून ओली  ||३||

काळासंगे रात्र एकटी स्वप्न दावते 
येईल सुखाची सांजवेळ अजून वाटते 
पहाट थोडी, सकाळ थोडी, थोडी दुपार 
क्षणभर जरी, तरी सांजवेळ हवी वाटते ||४||

कवेत भरून घ्यावी ती सांजवेळ 
एकांतासाठी सोबत करते सांजवेळ 
किती मांडला मी शब्दांचा खेळ 
अनुभवल्या विना कळणार नाही सांजवेळ  ||५||

कवी पंडित निंबाळकर
मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव
 जि अहमदनगर ७९७२५२३७१७

©Pandit Nimbalkàr #panditnimbalkar, #sanjvel
सांजवेळ 

रोज यावी, प्रेम बहरली सांजवेळ
स्पर्शात कोमलश्या, घेऊन गोडवा
आतूर भेटीची, वेळ अशी अनोखी 
पाहून लाजली दिशा, योग घडावा  ||१||

झुळूक गारव्याची मंतरलेली अन् 
काया नवथर, त्यांत थरथरलेली 
मने दोघांची होती पुन्हा बावरलेली 
सांजवेळ ही पुनवेची होती सजलेली  ||२||

किलबिल पाखरांची घरट्याशी सुरू 
दोन पाखरे मुकीच उभी झाडाखाली
झरझर क्षणात सरून जाते निशा 
दोन आसवांनी नाती भिजून ओली  ||३||

काळासंगे रात्र एकटी स्वप्न दावते 
येईल सुखाची सांजवेळ अजून वाटते 
पहाट थोडी, सकाळ थोडी, थोडी दुपार 
क्षणभर जरी, तरी सांजवेळ हवी वाटते ||४||

कवेत भरून घ्यावी ती सांजवेळ 
एकांतासाठी सोबत करते सांजवेळ 
किती मांडला मी शब्दांचा खेळ 
अनुभवल्या विना कळणार नाही सांजवेळ  ||५||

कवी पंडित निंबाळकर
मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव
 जि अहमदनगर ७९७२५२३७१७

©Pandit Nimbalkàr #panditnimbalkar, #sanjvel