Nojoto: Largest Storytelling Platform

साधारणतः ज्या विद्यार्थ्याला कमी मार्क मिळतात अशा

साधारणतः ज्या विद्यार्थ्याला कमी मार्क मिळतात अशा विद्यार्थ्यावर "ढ" विद्यार्थ्याचा शिक्का मारला जातो."ढ" चा अर्थ कमी हुशार.परंतु कमी मार्क मिळण्याचे कारण वेगळं असू शकतं. विद्यार्थ्याला त्या विषयात रसच नसेल, त्याच्या आवडीचे शिक्षक नसतील किंवा मग त्याला अभ्यास करायचा नसेल.काही विद्यार्थी,समजलं नसेल तरीही समजल्याचा आव आणतात.तर काही समजून न समजल्यासारखं करतात.
आपलं मन आपल्याला रोज नवनवे प्रश्न विचारत असतं.आपण त्या प्रश्नांची उत्तरं शोधत राहतो, नकळत मनाची अस्वस्थता वाढत जाते.मन कासावीस होऊ लागतं.असं घडत असेल तर आपणही "ढ" बनायला काय हरकत आहे.इथे "ढ" म्हणजेच ढोंगी बनलं तर..? सर्व समजून न समजल्यासारखं करायचं. शांत रहायचं.निदान तसा प्रयत्न तरी करायचा..लहान मुलाला नाही का,एखादं खेळणं हवं असताना आई टोलवाटोलवी करते आणि दुसरं खेळणं किती चांगलं आहे असं पटवून देते.तसच काहीस....
--प्रेरणा  #yqtaai #marathi #marathiwriter #marathi

yqtaai marathi marathiwriter marathi