_#कवी'धनूज. ~बालपण~ बालपण ना जाणे कोठे हरवले कोठे हरवली ती शाळा.. चिखला-मातीतल ते आयुष्य हरवला तो रानमाळा.. इवल्याशा पावलांनी आसमंत होता वेचला.. खळखळ वाजत होता पायामध्ये वाळा.. छोट्या-छोट्या हाता-पायांची धडपड आता ओसरली, हलवलेल्या पत्रांचा खेळ अन् आईच्या पदरांचा ठेवा.. जबाबदरीच्या साखळीचा जमला कसा घेरा, भातुकलीच्या खेळामधला हरवला रानमेवा, बालपण ना जाणे कोठे हरवले कोठे हरवली ती शाळा, चिखला-मातीतल ते आयुष्य हरवला तो रानमाळा, -लेखक'कवी- (धनंजय संकपाळ) #धनूज | रंग मनाचे. #बालपण