Nojoto: Largest Storytelling Platform

*विषय:-आस लागली मनी..* ***************** आस लागली

*विषय:-आस लागली मनी..*
*****************
आस लागली मना
तुझ्या भेटीची रे *मनाला,*
वेदना अंतरीची
कळणार कशी रे *तुला.*

सल ती वेदनेची
अशी काळजात *रुतली,*
स्नेहबंधाची नाळ
उदरी रुतून *बसली.*

समजावले किती
माझ्या त्या गलीत *गात्रांना,*
भावना उमजते 
डोळ्यांतील माझ्या *अश्रूंना.*

तगमग जीवाची
कळणार कधी ती *तुला,*
भावनाच सांगते
ओढ जीवा तुझी *मनाला.*
----------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
  -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke तगमग जीवाची👍👍
*विषय:-आस लागली मनी..*
*****************
आस लागली मना
तुझ्या भेटीची रे *मनाला,*
वेदना अंतरीची
कळणार कशी रे *तुला.*

सल ती वेदनेची
अशी काळजात *रुतली,*
स्नेहबंधाची नाळ
उदरी रुतून *बसली.*

समजावले किती
माझ्या त्या गलीत *गात्रांना,*
भावना उमजते 
डोळ्यांतील माझ्या *अश्रूंना.*

तगमग जीवाची
कळणार कधी ती *तुला,*
भावनाच सांगते
ओढ जीवा तुझी *मनाला.*
----------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
  -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke तगमग जीवाची👍👍