रावण मिरवून अहंकार मी गिरावतो मी पण ना रामाचे गुण अंगी तरी शोधतो रावण भेटला मला रावण ज्यासी न्हवते दहा डोकी सारेच समान त्याला काय आया बहिणी सुना लेकी मुकी असते जनता होते सर्रास सीतेचे हरण ना रामाचे गुण अंगी तरी शोधतो रावण भेटला मला रावण राजकारण ज्याचे कुळ बाण शब्दाचे फेकी असे जशी उडते हवेत धूळ जाई फासावरी शेतकरी ओले अश्रूंनी आंगण ना रामाचे गुण अंगी तरी शोधतो रावण भेटला मला रावण ज्यांचे नात्यात महाभारत वाढत जातात वाद उगा आवाज उंच स्वरात लक्ष्मण रेखा नात्याची तोडतात सारे कुंपण ना रामाचे गुण अंगी तरी शोधतो रावण भेटला मला रावण झाकता माझ्या मनात वाढले ओझे अन झाली गिनती दुबळ्या दिनात धूळ धुवून जशी घेऊन जाते श्रावण खरंच येतो का जाळता लपलेला अंतरीचा रावण? रचनाकार, सुरेश पवार, #दसरा