माघार नव्या नव्या प्रेमावर जळणारे तसे फार होते बऱ्याच दिवसांनी मी त्यांचे फेडले उधार होते चहा देखील पिला मी फुसकारा मारून गरम त्यांना लागले माझ्या पोटात तर पडले गार होते मी न केला कांगावा कधीच माझ्या प्रेमाचा माझ्या वतीने त्यांनीच केले फुकट प्रचार होते जे जे पडले पदरात ते भोगले मुकाट्याने माझ्या मौनेत सुडाचे लपले सार होते ते थकले खेळी करून तेव्हा एकच टाकला डाव बघा एकाच चालीने ते किती झाले बेजार होते खरा आठवलो मी त्यांना त्यांच्या वाईट काळात कुठे गेले ते सारे जे तेव्हा दिसले चिकार होते शेवटी त्यांची आली कीव अन केला मी प्रहार मजवर जेव्हा युद्धात फोल ठरले त्यांचे सारे हत्यार होते रचनाकार, सुरेश पवार #माघार