Nojoto: Largest Storytelling Platform

पिवळं सोनं सुपीक काळ्या आईत मिरगात पेरलं होत हळ

पिवळं सोनं 

सुपीक काळ्या आईत 
मिरगात पेरलं होत हळदीचं बेणं 

धगधगत्या वाऱ्यात
देवभरोसे सोडलं होत पावसाचं लेणं 

कवकवत्या वेदनांत 
दिनरात मांडलं होत काबाडकष्टाचं देणं 

रखरखत्या उन्हात
स्वप्नात चाललं होत हर्ष उल्हासाचं येणं 

मातृवत पूजत 
पुत्रवत जपत 
चैत्रात अखेर मिळालं हे मेहनतीचं पिवळं सोनं 

आता आस एवढीच की 
या मेहेनतीला व्यापारी अन सरकार देईल का चांगलं योग्य नाणं..???

©रामदास नरवाडे पाटील #Turmeric #farmer #marathi #kavita #maharashtra 
#Motivation #Kisan #कविता