पावसाच्या थेंबांनी सुद्धा तुझ्यावर... फुलांच्या कळ्या होऊन बरसावे... थंड वारा होऊनी गुलाबी प्रेमाचा... कोकीळेने गीत सुरेल गावे... अथांग सागराला किनार्याची साथ मिळावी... बघुन डोळ्यात तुझ्या मी प्रेम कविता म्हणावी... निजता निजता स्वप्नात सुद्धा तुच यावी... पहाटे उठुनी आठवण फक्त तुझीच यावी... वाटते तुझ्यासाठी मी हा स्वभाव बदलावा... रागीट चेहरा आता आनंदी असावा... पणतीला (तुला) पाहून ही वात (मी) कधीही न विझावी... खेळला नियतीने खेळ माझ्यासोबत मात्र आता साथ तुझी असावी... -For Someone Special 💓 #काकडे Someone Special 💓