बरेचदा आपण कुणाकडूनही अपेक्षा करत असतो. आई-बाबा मुलांकडून, प्रियकर -प्रेयसी एकमेकांकडून, मित्र-मित्राकडून, बहीण -भाऊ एकमेकांकडून आणखी असं बऱ्याच लोकांकडून आपण अपेक्षा करत असतो. पण बहुतेकदा आपलं अपेक्षा भंग होतो कारण, आपण एकदुसऱ्यावर अवलंबून राहतो पण खरं आहे. ह्या जगात कुणीच कुणाचं नाही. आपली सावली आणि आपलं आतापर्यंत जपलेलं शरीर सुद्धा शेवटपर्यंत आपल्या सोबत राहत नाही. तर ह्या स्वार्थी जगात परका माणूस तरी कुठं आपलं होणार. सगळेच फक्त काही काळच असतात आपल्या सोबत. नेहमी नाही. म्हणून अपेक्षा करायची तर स्वतःकडून करा. इतरांकडून नाही. (प्रीत ) अपेक्षा भंग