विधी लिखित कोसत राहिलो मी सदा स्वतःला न स्वतःच्या नशिबाला, माझ्या परिस्थितीसाठी सदैव.. नियतीचा खेळ हा मला कधी कळलाच नाही, केले मी कैक देव आणि उपवास, नशिबाचा भोग कधी मिटलाच नाही, पांघरुनी प्रकाश चहू बाजुंनी, आयुष्यातला अंधार कधी मिटलाच नाही, होते जीवनाचे संचय की पूर्वजन्मीचे जप-तप-पाप, विधी लिखित माझे कधी बदललेच नाही... ©Manoj A.Kale #विधीलिखित