Nojoto: Largest Storytelling Platform

#_पैलवानाच्या_आईचा_सन्मान संसारातल्या, रोजच्या जग

#_पैलवानाच्या_आईचा_सन्मान

संसारातल्या, रोजच्या जगण्यातल्या अनेक गोष्टी सोसुन, राबुन, आपल्या ममत्वाला दडवुन मुलाला पैलवानकीत धाडणारी आई खुप खंबीर काळजाची असते...
  
  पोरगा महाराष्ट्र गाजवतो तेव्हा घरातल्या चार भिंतीतच तिचं खंबीर काळीच सुपा ऐवढं झालेली आई कधी पडद्यावर आली नाही. मुलानं हजारो मैदाने जिंकली, लाखोने बक्षिसे जिंकली, लोकांनी किती तरी पुष्पांच्या माळा त्याच्या गळ्यात अडकवल्या पण त्या मुलाला जन्म घालणारी आई मात्र पडद्याआडच कौतुकास पात्र होती, परंतु शेवटी तो दिवस आलाच, तिच्या मातृत्वाचा आज जाहिर सन्मान झाला...  

  आमच्या आज्जीला शारदाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्या कर्तृत्ववान मुलांना शारदाबाई पवार सारख्या मातेने जन्माला घातले त्यांच्या नावे हा पुरस्कार देण्यात आलाय...
  
  महाराष्ट्राच्या कुस्ती शौकीनांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा मल्ल आमचे मामा आस्लम काझीच्या मातोश्रीचा सन्मान हा आमच्या घरात मुलांना पैलवान करण्यासाठी धडपडणार्या, त्या मुलासाठी झटणार्या प्रत्येक आईचा सन्मान मानावा लागेल... pailwan Sahani Baleshwar