Nojoto: Largest Storytelling Platform

एकट्याचं दुःख... उन्हात तळलेल्या झाडाला कुणाला सा

एकट्याचं दुःख...

उन्हात तळलेल्या झाडाला
कुणाला सांगता येत नाही..
गुमान गिळावं लागतं दुःख
कुणाशी भांडता येत नाही..

पाहिलेलं एखादं छोटंं स्वप्न
किड्या मुंगीसारखं मरून जातं..
संपर्क तुटलेल्या गोष्टीसाठी,
मन पुन्हा भरून येतं..

काळजात वीज  चमकावी
तसं वेदना घेऊन जगावं लागतं..
उध्दवस्त झालेलं स्वप्न,
उघड्या डोळ्यांनी बघावं लागतं..

झाडाशीच सलगी वाढते
इथं अनवाणी चालताना..
अन् भूतकाळाला कुरुवाळत
आता वर्तमानाला पेलताना..

मनाच्या खोल तळाशी
एक लपलेली जाणीव होते..
कुठंतरी कमी पडल्याची
केविलवाणी उणीव राहते..!
        copyright @kganesh
            9028110509 एकट्याच दुःख
एकट्याचं दुःख...

उन्हात तळलेल्या झाडाला
कुणाला सांगता येत नाही..
गुमान गिळावं लागतं दुःख
कुणाशी भांडता येत नाही..

पाहिलेलं एखादं छोटंं स्वप्न
किड्या मुंगीसारखं मरून जातं..
संपर्क तुटलेल्या गोष्टीसाठी,
मन पुन्हा भरून येतं..

काळजात वीज  चमकावी
तसं वेदना घेऊन जगावं लागतं..
उध्दवस्त झालेलं स्वप्न,
उघड्या डोळ्यांनी बघावं लागतं..

झाडाशीच सलगी वाढते
इथं अनवाणी चालताना..
अन् भूतकाळाला कुरुवाळत
आता वर्तमानाला पेलताना..

मनाच्या खोल तळाशी
एक लपलेली जाणीव होते..
कुठंतरी कमी पडल्याची
केविलवाणी उणीव राहते..!
        copyright @kganesh
            9028110509 एकट्याच दुःख

एकट्याच दुःख