Nojoto: Largest Storytelling Platform

एकदातरी हे happy कुटुंब पाहता येईल का मला? एक दिवस

एकदातरी हे happy कुटुंब पाहता येईल का मला?
एक दिवस 'समृद्धी' मध्ये राहता येईल का मला?

अरुच्या स्वयंपाकघरात जाता येईल का मला?
तिच्यासोबत वेगवेगळे पदार्थ करता येतील का मला?
रोज सकाळी तिचं गाणं ऐकता येईल का मला?
नेहमी तिच्या पाठीशी उभं राहता येईल का मला?
एक दिवस समृद्धी मध्ये राहता येईल का मला?

बाबांसोबत मोठी स्वप्न पाहता येतील का मला?
ती स्वप्न पूर्ण करायला ते साथ देतील का मला?
'तुम्ही चुकताय' असं ठामपणे सांगता येईल का मला?
रुसवे विसरुन त्यांना 'बाबा' म्हणता येईल का मला?

आप्पांसोबत गप्पा रंगवता येतील का हो मला?
त्यांच्यासोबत बागेमध्ये जाता येईल का मला?
त्यांच्यासारखं योग्य वेळी बोलता येईल का मला?
तसंच सर्वांशी मायेने वागता येईल का मला?

आजीसारखं रागातून प्रेम दाखवता येईल?
मूल चुकल्यावर त्याला हक्काने ओरडता येईल?
असं असलं तरीही ती चुकतेय हे सांगता येईल का मला?
कोण चूक,कोण बरोबर हे उमजेल का तिला?

अभीसारखं गोड हसू मिळेल का हो मला?
स्वत:चं स्वप्न पूर्ण करुन दाखवता येईल का मला?
त्याच्यासारखं दुसर्यांसाठी झटता येईल का मला?
त्याच्यासारखं सर्वांना सांभाळून घेता येईल का मला?

अनघा सारखी हिंमत कधी दाखवू शकेन?
सारखी ठेच लागत असताना पुन्हा चालू शकेन?
ती किती शूर आहे हे सांगता येईल का हो मला?
इतरांसाठी काही काम करता येईल का मला?

यश सारखं 'गुणी बाळ' बनता येईल का मला?
गिटार त्याचं एकदा हाती घेता येईल का मला?
त्याचा live performance पाहता येईल का मला?
कधीतरी त्याच्यासोबत गाता येईल का मला?

2 वर्ष घरापासून मी लांब राहिले 
बाहेरचे जग अगदी,अगदी जवळून पाहिले!
म्हणूनच कदाचित गौरी मला जास्त जवळची वाटते...
तिला रडताना पाहिलं की डोळ्यात पाणी साठते!
हे सारं तिच्यासोबत शेयर करता येईल का मला?

ईशा इतकंच वय माझं...अंगी तसाच खोडकरपणा...
कळ काढते सगळ्यांची! मस्तिखोरंच म्हणा!
पण टेंशन मध्ये असं पाउल उचलायचं नसतं...
हे समवयस्क ईशाला सांगता येईल का मला?

संजना ची जिद्द नक्कीच कौतुकास्पद आहे!
पण ती योग्य ठिकाणी वापरता येईल का मला?
इतकी पात्रता असताना पुन्हा पुन्हा चुकतेय ती...
इतकी साधी गोष्ट समजावता येईल का मला?

Only विमल...गे बाय माजे...काय बोलू तुला?
तुझ्यासोबत मालवणी बोलता येईल का मला?
कोण म्हणेल तुला "तू अशिक्षीत आहेस" ?
तुझ्याइतकी विवेकी कोणी सापडेल का मला?

हे सारे प्रश्न विचारायचेत ...
उत्तरं मिळतील का मला?
कधी भेटलोच तर 
पहिल्या नजरेत ओळखतील का मला?
खरंच या सर्वांना भेटता येईल का मला?

©Anagha Ukaskar #marathipoem #MarathiKavita on AKKK family!

#alone