Nojoto: Largest Storytelling Platform

प्रिय मित्र राकेश यांस साष्टांग नमस्कार, प्रथमतः त

प्रिय मित्र राकेश यांस साष्टांग नमस्कार,
प्रथमतः तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीही तुझा वाढदिवस आला.त्यानिमित्ताने तुझ्यासाठी अगदी मनमोकळं लिहावं ह्यासाठी मी वेळ काढला.एरवी लोकांकडे वेळ असतोच कुठे म्हणा!!!अर्थात वेळेचं नियोजन त्यांच्याकडं नसतं.
आयुष्यात प्रत्येक जण आनंदाच्या शोधात आहे.पण त्या शाश्वत आनंदाचं मूळ आपल्या अंतरी वसलेलं असतांना आपण का उगाच बेभानपणे पळत सुटायचं.नाही का?मित्रा आयुष्य असंच निखळ आनंद उपभोगून जगायचं.स्वतःच्या विश्वात मस्त रमायचं.आपण स्वतः आपल्या आनंदाच्या तरंगांवर स्वार व्हायचं.शक्यतो तुझ्या मर्जीप्रमाणेच वाग.लोकांच्या मर्जीने वागायला आपण थोडीच रोबोटची पैदास आहे.पण एक नक्की जगाच्या कल्याणासाठी जगता आलं तर बघं तिथेही थोडाफार आनंद मिळेल.रडक्या चेहऱ्यांना हसव.ते तुला भारी जमतं!!!जळक्या लोकांना विझवता आलं तर बघ बाबा....पृथ्वीचं तापमान फारच वाढतंय रे!!!सोबत तुझीही काळजी घे.
पालकाच्या भाजीत भात हे रँडम असोशिएशन फारचं भारी ये तुझं.गाडीचा स्पीड जरा कमी कर.आपल्या परिवाराची काळजी घे.संध्याकाळी एक काम करशील,एखाद्या गरीब भिकारी व्यक्तिला,शाळेतल्या एखाद्या गरीब विद्यार्थ्याला थोडीफार मदत करता आली तर नक्की कर....
                                                    
                                                    आपला मित्र,
                                                        -चेतन सावकार01

#आदीHUMAN #chetan#ss