Nojoto: Largest Storytelling Platform

सोपं नसतं बायको बनून कुणाच्यातरी आयुष्यात जाणं...

सोपं नसतं बायको बनून
कुणाच्यातरी आयुष्यात जाणं...

बालपणातील आठवणींना 
स्वतःच्या हाताने लोटून देणं...

नवर्‍याला यायला उशीर होतो तेव्हा
जीवाचं कितर कातर होणं....
स्वयंपाक घर ते दार 
सारखसारखं डोकाऊन पाहणं...
मनातल्या मनात वाईट घेऊन
देवघरात धावत जाणं....

नवरा दारात दिसताच,
जीवातजीव येणं.....
आईच्या मायेनं चेहर्‍यावरचे 
भाव ओळखून घेणं....
आणि तो जेवल्यावरच आपण 
तृप्तीचा ढेकर देणं...
सोपं नसतं बायको असुन 
नवर्‍याची आई होणं

सोपं नसतं ठेच लागेल तेव्हा 
त्याला साथ देणं
त्याची सारी संकट 
स्वतःहून अंगावर घेणं
न सांगता त्याच गणगोत 
आपलं करून घेणं
त्याच्या जबाबदार्‍या आपणहून 
आपल्या शिरी घेणं.
सोपं नसतं बायको असून
बहिणीच्या मायेनं समजून घेणं....

सोपं नसतं हसत खेळत 
प्रत्येक अडचणींना सामोरं जाणं...
मागच सोडून पुढे चांगलच 
घडेल याची वाट पाहणं..
आपला धीर सुटत असताना, 
त्याला मात्र धीर देणं..
सोपं नसतं बायको असून 
मैत्रीच्या नात्यानं समजून घेणं...

सोपं नसतं, 
नको त्या शिव्या अन 
नको ते शब्द ऐकणं..
नको असतं ते रूद्राचं तांडव अन 
नको असतं ते बेभान होणं, 
नको असतो तो तमाशा 
आणि नको वाटतं ते जीणं
सोपं नसतं त्याचा रूद्रावतार तोलून 
धरणाऱ्या सखीच्या नात्यानं पार्वती होणं...

सोपं नसतं रक्ताची माणसं विसरून जाणं.
सोपं नसतं नवी नाती निर्माण करणं.
सोपं नसतं एका माणसापायी 
अख्खं कुटुंब एकमेकांशी जोडणं.
स्वतःच्या मान मर्यादा स्वत्व विसरणं
आणि आशा अपेक्षांना विसरून जाणं.
सोपं नसतं बायको असून 
नवरी होते हे विसरून जाणं...

सोपं नसतं आपला त्रास बाजूला ठेवून 
अखंड त्याला बळ देणं
एवढ करून सुध्दा आपण मात्र दूर राहणं...
त्याला राज्यपद देऊन आपण 
त्याची राणी नव्हे दासीच होणं...
सोपं नसतं बायको म्हणून आयुष्यात येणं 
अन बायको राहून निभावून नेणं.

💐सर्व स्त्रियांना समर्पित💐

©piyusha Raj khrch sop nst.....

#vacation
सोपं नसतं बायको बनून
कुणाच्यातरी आयुष्यात जाणं...

बालपणातील आठवणींना 
स्वतःच्या हाताने लोटून देणं...

नवर्‍याला यायला उशीर होतो तेव्हा
जीवाचं कितर कातर होणं....
स्वयंपाक घर ते दार 
सारखसारखं डोकाऊन पाहणं...
मनातल्या मनात वाईट घेऊन
देवघरात धावत जाणं....

नवरा दारात दिसताच,
जीवातजीव येणं.....
आईच्या मायेनं चेहर्‍यावरचे 
भाव ओळखून घेणं....
आणि तो जेवल्यावरच आपण 
तृप्तीचा ढेकर देणं...
सोपं नसतं बायको असुन 
नवर्‍याची आई होणं

सोपं नसतं ठेच लागेल तेव्हा 
त्याला साथ देणं
त्याची सारी संकट 
स्वतःहून अंगावर घेणं
न सांगता त्याच गणगोत 
आपलं करून घेणं
त्याच्या जबाबदार्‍या आपणहून 
आपल्या शिरी घेणं.
सोपं नसतं बायको असून
बहिणीच्या मायेनं समजून घेणं....

सोपं नसतं हसत खेळत 
प्रत्येक अडचणींना सामोरं जाणं...
मागच सोडून पुढे चांगलच 
घडेल याची वाट पाहणं..
आपला धीर सुटत असताना, 
त्याला मात्र धीर देणं..
सोपं नसतं बायको असून 
मैत्रीच्या नात्यानं समजून घेणं...

सोपं नसतं, 
नको त्या शिव्या अन 
नको ते शब्द ऐकणं..
नको असतं ते रूद्राचं तांडव अन 
नको असतं ते बेभान होणं, 
नको असतो तो तमाशा 
आणि नको वाटतं ते जीणं
सोपं नसतं त्याचा रूद्रावतार तोलून 
धरणाऱ्या सखीच्या नात्यानं पार्वती होणं...

सोपं नसतं रक्ताची माणसं विसरून जाणं.
सोपं नसतं नवी नाती निर्माण करणं.
सोपं नसतं एका माणसापायी 
अख्खं कुटुंब एकमेकांशी जोडणं.
स्वतःच्या मान मर्यादा स्वत्व विसरणं
आणि आशा अपेक्षांना विसरून जाणं.
सोपं नसतं बायको असून 
नवरी होते हे विसरून जाणं...

सोपं नसतं आपला त्रास बाजूला ठेवून 
अखंड त्याला बळ देणं
एवढ करून सुध्दा आपण मात्र दूर राहणं...
त्याला राज्यपद देऊन आपण 
त्याची राणी नव्हे दासीच होणं...
सोपं नसतं बायको म्हणून आयुष्यात येणं 
अन बायको राहून निभावून नेणं.

💐सर्व स्त्रियांना समर्पित💐

©piyusha Raj khrch sop nst.....

#vacation
piyusharajput2199

piyusha Raj

New Creator