Nojoto: Largest Storytelling Platform

मृगजळाच्या पटलावरती भास कुणाचा होतो आहे कुण्या अ

मृगजळाच्या पटलावरती 
भास कुणाचा होतो आहे 
कुण्या अनामिक सावलीला 
काळोखही स्मरतो आहे 
किंकाळीचा स्वर घाबरा 
पावलांत घुटमळताना 
भयाण काळरात्रीने पाहिला 
तो दिवस मावळताना 
खोटे खोटे असंख्य मुखवटे 
लयास जातील आता 
कुण्या नभाची सागराशी 
सलगी होईल आता
अश्याच वेळी देह एकला  
जळत असेल सरणावरती 
शोधित असेल स्वतःला 
आयुष्याच्या  वाटेवरती #रात्रीच्या_गोष्टी  #काळरात्र_वगैरे
मृगजळाच्या पटलावरती 
भास कुणाचा होतो आहे 
कुण्या अनामिक सावलीला 
काळोखही स्मरतो आहे 
किंकाळीचा स्वर घाबरा 
पावलांत घुटमळताना 
भयाण काळरात्रीने पाहिला 
तो दिवस मावळताना 
खोटे खोटे असंख्य मुखवटे 
लयास जातील आता 
कुण्या नभाची सागराशी 
सलगी होईल आता
अश्याच वेळी देह एकला  
जळत असेल सरणावरती 
शोधित असेल स्वतःला 
आयुष्याच्या  वाटेवरती #रात्रीच्या_गोष्टी  #काळरात्र_वगैरे