Nojoto: Largest Storytelling Platform

इथे आता कुणाचे काही निशान उरले नाही जिथे राख झाल

इथे आता कुणाचे काही निशान उरले नाही 
 जिथे राख झाले सगळे ते स्मशान उरले नाही

 उगाच कसला चौफेरी तू देव शोधतो आहे
 तू रोज पूजतो ज्याला तेही पाशान उरले नाही

 मग कशाला आकाशाशी तू बेस्वप्न भिडतो आहे
 त्यालाच पाऊस मागणारे इथे किसान उरले नाही

 तुझ्या दिलाला आता धीर तूच द्यायचा आहे
 कठीण झाले सगळे काही आसान उरले नाही

 माय पित्यालाच आता इथे वृद्धाश्रम मिळतो आहे
घे समजून कुणाचे कुणावर ऐहसान उरले नाही            


-   गोविंद अनिल पोलाड
इथे आता कुणाचे काही निशान उरले नाही 
 जिथे राख झाले सगळे ते स्मशान उरले नाही

 उगाच कसला चौफेरी तू देव शोधतो आहे
 तू रोज पूजतो ज्याला तेही पाशान उरले नाही

 मग कशाला आकाशाशी तू बेस्वप्न भिडतो आहे
 त्यालाच पाऊस मागणारे इथे किसान उरले नाही

 तुझ्या दिलाला आता धीर तूच द्यायचा आहे
 कठीण झाले सगळे काही आसान उरले नाही

 माय पित्यालाच आता इथे वृद्धाश्रम मिळतो आहे
घे समजून कुणाचे कुणावर ऐहसान उरले नाही            


-   गोविंद अनिल पोलाड