Nojoto: Largest Storytelling Platform

नियती.. नियती दिसत नाही अनुभवाचे दाखले देते, कुठल

नियती..

नियती दिसत नाही
अनुभवाचे दाखले देते,
कुठलं तरी हिसकावून
कुठं ओंजळभर देते..

अगदी कर्माच्या कसोटीवर
निरपेक्ष परीक्षा घेते,
ज्याचा त्याला कळेल असा
अनुभूतीचा निकाल देते..

सूर्य मावळतो, उगवतो तसं
सर्व नियमावर ठरवते,
इथं माणसांच्या कर्मावर
करडी नजर फिरवते..

इथं बुद्धीवान माणूसही
हताश होवून झुकतो,
गुन्हेगार अपराध्यासारखं
नियतीपुढं गुढगे टेकतो..

जन्म अन् मरण इथं
कुणालाही चुकत नाही,
माणूस राहतो भ्रमात
नियती कधी झुकत नाही.!
                    copyright @kganesh
                  9028110509 नियती
नियती..

नियती दिसत नाही
अनुभवाचे दाखले देते,
कुठलं तरी हिसकावून
कुठं ओंजळभर देते..

अगदी कर्माच्या कसोटीवर
निरपेक्ष परीक्षा घेते,
ज्याचा त्याला कळेल असा
अनुभूतीचा निकाल देते..

सूर्य मावळतो, उगवतो तसं
सर्व नियमावर ठरवते,
इथं माणसांच्या कर्मावर
करडी नजर फिरवते..

इथं बुद्धीवान माणूसही
हताश होवून झुकतो,
गुन्हेगार अपराध्यासारखं
नियतीपुढं गुढगे टेकतो..

जन्म अन् मरण इथं
कुणालाही चुकत नाही,
माणूस राहतो भ्रमात
नियती कधी झुकत नाही.!
                    copyright @kganesh
                  9028110509 नियती

नियती