"काय भित्रा माणूस आहेस तू बांगड्या भर हातात..!" अस म्हणणाऱ्या सगळ्यांना समर्पित..... त्यांना सांगायचं आहे जे तुम्ही कमजोरी प्रतीक समजता ना, त्याच बांगड्या भरलेल्या हातांनी माझ्या छत्रपतींना घडवले, त्याच बांगड्या भरलेल्या हातांनी ३० वर्षाचा तुरुंगवास सहन केला पण स्वराज्याच् स्वप्न तेवत ठेवले, त्याच बांगड्या भरलेल्या हातांनी हाती शिवलिंग घेऊन स्वराज्याला विष पचवायला शिकवले, एवढच काय तर तुम्ही जन्म घेतला ना, त्याही बांगड्या भरलेल्या हातांनी तेव्हा सगळी हाडे एकसाथ मोडल्याची वेदना सहन केली.. आणि.... म्हणे..... " काय भित्रा माणूस आहेस तू बांगड्या भर हातात ..!" अहो, त्या बांगड्या साहसाचे प्रतीक आहे कमजोरीचे नाही. ❤️❤️ Vigorous vibsss❤️❤️ ©Vaishnavi Pardakhe #vigorousVibsss #vaishnavipardakhe #marathi #marathivichar #Nojoto #marathiquotes #mulgi #marathimulgi #poem #Marathipoem