प्रिय बाप्पा .... ढोल ताशांचा गजर,गुलालाची उधळण झाले आज तुझे आगमन प्रिय बाप्पा, बुद्धीचा तुच देवता कर विकृतीचा नाश ,तोड अविवेकाचे पाश दे अन्याया विरुद्ध लढण्याची तु शक्ती व्यर्थ न जाओ भाबडी भक्ती प्रिय बाप्पा, आहेस ना तू एक, मग का भांडतात तुझे भक्त लेक प्रत्येक गल्लीचा वेगळा राजा , dj चा भलताच गाजावाजा खरच होते का तुला हे सहन , का तुही शांत बसतोस हताश होऊन प्रिय बाप्पा तुझ्या आगमनाने मात्र स्फूर्ती जागवली नवीन चैतन्य पेरून तुटलेल्या आशांना नवी दिशा दाखवली येऊन तू हरवलेल्या माणसातली माणुसकी जागवली _sensitive_ink_of bhagyashree bappa