Nojoto: Largest Storytelling Platform

#OpenPoetry मृत्यू जगातलं सगळ्यात शाश्वत असलेलं सत

#OpenPoetry मृत्यू
जगातलं सगळ्यात शाश्वत असलेलं सत्य,
जेव्हा शेवटचे क्षण मोजत होतं,
तेव्हा त्याला शाश्वत म्हणजे काय ते कळलं,
तेव्हा, त्याला मृत्यू कळला।
मनुष्य नेहमी विवंचनेत जगतो,
त्यातून बाहेर पडताना होणारे कष्ट,
त्यात होणारी तगमग,
सगळी संपत आली की त्याला मृत्यू कळतो।
अव्यक्ताची कास धरणारा माणूस
जेव्हा निसर्गाला आपलंसं करेल, 
त्याच्या अमर्याद शक्तीपुढे मान तुकवेल आदराने
तेव्हा त्याला मृत्यू कळेल।। #मृत्यू
#OpenPoetry मृत्यू
जगातलं सगळ्यात शाश्वत असलेलं सत्य,
जेव्हा शेवटचे क्षण मोजत होतं,
तेव्हा त्याला शाश्वत म्हणजे काय ते कळलं,
तेव्हा, त्याला मृत्यू कळला।
मनुष्य नेहमी विवंचनेत जगतो,
त्यातून बाहेर पडताना होणारे कष्ट,
त्यात होणारी तगमग,
सगळी संपत आली की त्याला मृत्यू कळतो।
अव्यक्ताची कास धरणारा माणूस
जेव्हा निसर्गाला आपलंसं करेल, 
त्याच्या अमर्याद शक्तीपुढे मान तुकवेल आदराने
तेव्हा त्याला मृत्यू कळेल।। #मृत्यू