Nojoto: Largest Storytelling Platform

#स्मार्ट-फोन 😢😢 चार भिंतीच्या आत खेळ रंग

#स्मार्ट-फोन 😢😢

चार भिंतीच्या आत
       खेळ रंगू लागले
कपड्यांस गवताचा
      आता सुवास नाही

विसरून खेळ सारे
       आभासी स्पर्शात दंग
मैदानी खेळांचा
       आता हव्यास नाही

आधीन झाले सर्व
       मिळविण्या माहिती तत्पर
विचार शक्तीचा
       आता प्रयास नाही

सोडून सर्व अंग
       बोटांवर भार आला
कोवळ्या शरीराचा
       आता विकास नाही

रडू थांबविण्या बालकांचे
       मोबाईल इलाज झाला
कडेवरील झोक्यांचा
       आता प्रवास नाही

--अभय भोंगळे  😌😌 स्मार्ट फोन..
#स्मार्ट-फोन 😢😢

चार भिंतीच्या आत
       खेळ रंगू लागले
कपड्यांस गवताचा
      आता सुवास नाही

विसरून खेळ सारे
       आभासी स्पर्शात दंग
मैदानी खेळांचा
       आता हव्यास नाही

आधीन झाले सर्व
       मिळविण्या माहिती तत्पर
विचार शक्तीचा
       आता प्रयास नाही

सोडून सर्व अंग
       बोटांवर भार आला
कोवळ्या शरीराचा
       आता विकास नाही

रडू थांबविण्या बालकांचे
       मोबाईल इलाज झाला
कडेवरील झोक्यांचा
       आता प्रवास नाही

--अभय भोंगळे  😌😌 स्मार्ट फोन..

स्मार्ट फोन..