Nojoto: Largest Storytelling Platform

चल उठ मर्दा...माईसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कर. स

चल उठ मर्दा...माईसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कर.

सोसावे लागले कितीही कष्ट 
देऊ नको तिला कधीही अंतर
उतराई होण्या माईचे उपकार 
 घे माईला खांद्यावर
चल उठ मर्दा... माईसाठी प्रयत्नांची परकाष्ठा कर.

खाव्या लागल्या कितीही खास्ता
दूर नको करू ते मायेच छप्पर 
जाणीव ठेव तिच्या त्या दुधाची सर
 घे माईला डोक्यावर 
चल उठ मर्दा..माईसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कर.

अपमानाच्या कडाडल्या कितीही वीजा 
सोडू नको परी ते मायेच उदर 
उरी गुंडाळुन घे ती मायेची चादर 
 घे माईला कडेवर 
चल उठ मर्दा...माईसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कर.

कोसळले कितीही दुःखाचे डोंगर
दूर लोटू नको ती ममतेची बखर 
करी असू दे सदा तो मायेचा सागर 
 नि घे माईला पलकांवर
चल उठ मर्दा...माईसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कर. 

असू कितीही दैन्य,दारिद्र्याची गुढी 
पाठी मिरव ती चैतन्याची मुर्ती 
काही कमी पडणार नाही कधी 
सगळ्या दैन्यांचा तुला पडेल विसर 
घे माईला पाठीवर 
चल उठ मर्दा...माईसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कर. 

उसळला कितीही विंवचनेचा महासागर 
दूर नको ठेवू ती जिव्हाळ्याची घागर 
डोळ्यात साठवून घे ते प्रेमाचे आगर 
घे माईला ह्रदयावर
चल उठ मर्दा...माईसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कर. 
                                              -Soma... चल उठ मर्दा