Nojoto: Largest Storytelling Platform

#बा विठ्ठला धाव पाव रे दाव रूप ते सावळे.... नाही ब

#बा विठ्ठला धाव पाव रे दाव रूप ते सावळे....
नाही बरा काळ नाही बरी येळ देखाया सकळ दृष्टी द्यावी 
कित्येक वादळं आली आमच्या आयुष्यउंबऱ्यावरी
मार्गी लाव त्यांना अशी तुझी कायम कृपा रहावी
अठ्ठावीस युगे तु विटेवरी उभा ठेवूनीया दोन्ही कर कटेवरी
तुझी माया अपार बा विठ्ठला राहु दे सदा सर्वकाळ आम्हा लेकरावरी
येईन गे माये मी तुझ्या पंढरपुरी भेटाया माझ्या विठ्ठलास
जोवर आहे माझा देवा हा जलम तोवर तुझी वारी चुकु नेदे हरी
रामकृष्णहरी विठ्ठल पांडुरंग माझा सखा तु श्रीरंग
रंगुनीया जाईन मी तुझ्या सावळ्या रंगात
राहीन सदा तुझ्या नामसंकीर्तनात दंग
येईन गे माये तया पंढरपूरी
भेटेन माझ्या विठुरखुमाईला याच दरबारी 
सदा कृपा देवा तुझी आमच्यावरी असावी
ठेवीन माथा सदा तुझ्या चरणावरी
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #विठ्ठल_विठ्ठल