किती सहजपणाने डाव उधळून जातो भोगी मरण यातना दाह विरहाचा देतो नको पानांची सलगी भाव विरक्त रंगला पाचोळ्याचा जीव भोळा भास तेथेच गुंगला थेंब थेंब सावलीत ठिबकत क्षण ओला घेई टिपून हळूच सांज कातर वेळेला नको लावूस उशीर वेल आशेची सुकली डोळे न्याहाळती तुला वाट कशी रे चुकली? उर हापापतो आज नावं येता ओठांवर तुला तेंव्हाच गोंदले भाव मनः पटावर पिऊ टिपूर चांदणे झुलू स्वप्नांचाच झुला खूप बरसणे आहे फक्त ओंजळ दे मला ©Shankar Kamble #Colors #प्रेम #प्रीत #विरह #विरह_वेदना #विरहातल्याआठवणी #विरही_जीवन… #विरहकविता #तू #तू_आणि_मी