*एकमेकां करां साह्य* *बंधुभाव वाढवावा* *भेद विसरून सारे* *गुंता, भ्रम सोडवावा* *विस्तारले आज पात्र* *हव्यासाच्या सरितेचे* *कोण घालणार बांध?* *पूर लोटले विषाचे* *सत्य, शाश्वत अमर* *लख्ख प्रकाशा सारखे* *नको संग अंधाराचा* *होय स्वतःस पारखे* *घाव सोसता घणाचे* *देवपण ये पाषाणा* *उपकारा झिजवावा* *देह धनी तो शहाणा* *दोर तुटता श्र्वासाचा* *खेळ सारा हा संपला* *आखलेल्या परिघाचा* *व्यास क्षणांत लोपला* *मृगजळ हे फसवे* *सार जगण्याचे सोपे* *जग उजळण्या रवी* *संथ निरंतर तापे* ©Shankar Kamble #Flower #मैत्री #जग #माणुसकी #वागणं #प्रेम #बंधुभाव #भाईचारा #देश