Nojoto: Largest Storytelling Platform

*कल्लोळ वेदनांचा* *हुंकार दाटलेला* *उंबऱ्याआड

*कल्लोळ वेदनांचा* 
 *हुंकार दाटलेला* 
 *उंबऱ्याआड आजही* 
 *टाहो पेटलेला* 

 *जळते किती निखारे* 
 *पदरात बांधलेले* 
 *आभास मुक्ततेचा* 
 *श्रृंखलेत वेढलेले* 

 *घायाळ तनां-मनांला* 
 *लिंपण उरे ना काही* 
 *चूक एवढी विधात्या* 
 *जन्मा घातलीस बाई* 

 *बंदिनी असे युगांची* 
 *भोग बाईपण सरेना* 
 *तुझ्या पुढारलेल्या विचारांचा* 
 *खोटा बुरखाही पुरेना* 

 *लटकल्या पेटवल्या* 
 *खोट्या प्रतिष्ठे नाडल्या* 
 *देह लचके तोडूनी* 
 *किती मातीत गाडल्या* 

 *श्वास उसने अस्तित्वाचे* 
 *उपरे जीणे बांडगुळाचे* 
 *माझी मीच मला पारखी* 
 *बंड शमले चेतनेचे*

©Shankar Kamble #स्त्री #बाई #स्त्रीजीवन #बाईच्या_जातीने #दुःख #जगणे_येथे_महाग_झाले
*कल्लोळ वेदनांचा* 
 *हुंकार दाटलेला* 
 *उंबऱ्याआड आजही* 
 *टाहो पेटलेला* 

 *जळते किती निखारे* 
 *पदरात बांधलेले* 
 *आभास मुक्ततेचा* 
 *श्रृंखलेत वेढलेले* 

 *घायाळ तनां-मनांला* 
 *लिंपण उरे ना काही* 
 *चूक एवढी विधात्या* 
 *जन्मा घातलीस बाई* 

 *बंदिनी असे युगांची* 
 *भोग बाईपण सरेना* 
 *तुझ्या पुढारलेल्या विचारांचा* 
 *खोटा बुरखाही पुरेना* 

 *लटकल्या पेटवल्या* 
 *खोट्या प्रतिष्ठे नाडल्या* 
 *देह लचके तोडूनी* 
 *किती मातीत गाडल्या* 

 *श्वास उसने अस्तित्वाचे* 
 *उपरे जीणे बांडगुळाचे* 
 *माझी मीच मला पारखी* 
 *बंड शमले चेतनेचे*

©Shankar Kamble #स्त्री #बाई #स्त्रीजीवन #बाईच्या_जातीने #दुःख #जगणे_येथे_महाग_झाले