Nojoto: Largest Storytelling Platform

कोजागिरीच्या चांद राती, प्रीत रस वरशील का? गेलास अ

कोजागिरीच्या चांद राती, प्रीत रस वरशील का?
गेलास अधुरी सोडुनी, ओल्या मिठी धरशील का?

मी पेरल्या होत्या कळ्या, वाटेत तुजसाठी सख्या
सुकल्या कळ्यांची वाट मी, गंधाळुनी भरशील का?

मी एकटी नाही इथेशी, सौदामिनी चित्कारते 
होऊन तू प्यासा कधी सम चातका दिसशील का? 

कोजागिरी, मी हिरकणी अन मीच ती सहचारिणी 
आहेस तू माझीच तू येऊन मज म्हणशील का?

मी रंगले ऐशी प्रिया माझीच मी ना राहिले 
देऊन मज वरदान तू अर्धांगिनी करशील का?

नंदसुत मराठी गज़ल #nojoto #nojotopoetry #marathikavita #ghazal #kavita Satyaprem Arpita Dharmadhikari Garud  अल्ताफ़ कलंदर  Priyanka Raje

sanketsule6936

Sanket Sule

New Creator