Nojoto: Largest Storytelling Platform

ज्ञानाची समाधी । त्रैलोक्यी पावली । धन्य धन्य झाली

ज्ञानाची समाधी । त्रैलोक्यी पावली ।
धन्य धन्य झाली । लंकापुरी ॥१॥

अलंकापुरी ती । झालिया महान । 
किती गुणगान । माऊलीचे ॥२॥ 

भरे कार्तिकीस । वैष्णवांचा मेळा ।
याची देही डोळा । पहा तुम्ही ॥३॥

टाळ नि मृदंग । कीर्तन गजर ।
सारे सान थोर । वाळवंटी ॥४॥

गळीयासी वीणा । ध्वजा खांद्यावरी ।
मुखी नाम हरी । चाले घोष ॥५॥ 

जो तो दिसतोचि । हरी नामा दंग । 
गाती ती अभंग । भक्तजन ॥६॥

इंद्रायणी तीरी । चाले हा सोहळा।
होवोनिया गोळा । भागवत ॥७॥

देवा वाटे सुख । काय काय वर्णू ।
जणू स्पर्श स्वर्णू । झाला असे ॥८॥

©•देवानंद जाधव• धामणी, पुणे.  
 9892800137

©Devanand Jadhav #कविता #Thought #thought #shayari  #शायरी  #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral
ज्ञानाची समाधी । त्रैलोक्यी पावली ।
धन्य धन्य झाली । लंकापुरी ॥१॥

अलंकापुरी ती । झालिया महान । 
किती गुणगान । माऊलीचे ॥२॥ 

भरे कार्तिकीस । वैष्णवांचा मेळा ।
याची देही डोळा । पहा तुम्ही ॥३॥

टाळ नि मृदंग । कीर्तन गजर ।
सारे सान थोर । वाळवंटी ॥४॥

गळीयासी वीणा । ध्वजा खांद्यावरी ।
मुखी नाम हरी । चाले घोष ॥५॥ 

जो तो दिसतोचि । हरी नामा दंग । 
गाती ती अभंग । भक्तजन ॥६॥

इंद्रायणी तीरी । चाले हा सोहळा।
होवोनिया गोळा । भागवत ॥७॥

देवा वाटे सुख । काय काय वर्णू ।
जणू स्पर्श स्वर्णू । झाला असे ॥८॥

©•देवानंद जाधव• धामणी, पुणे.  
 9892800137

©Devanand Jadhav #कविता #Thought #thought #shayari  #शायरी  #poem  #Poet  #marathi #MarathiKavita #viral