Nojoto: Largest Storytelling Platform

झिजुन गुलाबाचे काटे गेले कधी हे कळलेच नाही आधार वा

झिजुन गुलाबाचे काटे गेले कधी हे कळलेच नाही
आधार वाढत्या वेलीस कसा मिळाला हे दिसलेच नाही..

गर्जनेचा नभांच्या,हा रोष कधी जाणलाच नाही
अंधारात प्रकाश विजेचा मज कधी भावलाच नाही..
 
किलबिलाट म्हणु का वेदना संबोधु कधी उलगडलेच नाही
सप्तसुरांचा हा मेळ म्हणू का कल्लोळ कधी उमगलेच नाही..

सुर्याच्या ज्वालेस शितलता चंद्राची कधी मिळालीच नाही
मृगजळ दाखवण्याचा वाटसरूस हा डाव कधी काळजास भिडलाच नाही..

आस्तित्वाचा तुझ्या स्पर्श या देहास कधी लाभलाच नाही 
अन              अखंड श्रद्धेचा हा भार कधी घटलाच नाही.. #Gazal
#marathigazal
#poetry
#marathi
#nojotomarathi
#kavita
#marathilove
#mothertounge