Nojoto: Largest Storytelling Platform

घरातल्या भिंती(लेख👇) अनोळख्या नंबरवरून कॉल आला.कॉ

घरातल्या भिंती(लेख👇) अनोळख्या नंबरवरून कॉल आला.कॉल घ्यायचा की नाही या संभ्रमात घेतलाच.हॅलो म्हटल्यावर समोरच्या व्यक्तीला माझा आवाज ऐकायला येत नव्हता.मी हॉलमध्ये गेले तिथेही अधूनमधून आवाज तुटत होता.शेवटी किचनमध्ये खिडकीजवळ गेले तसा सर्व प्रॉब्लेम दूर झाला.त्यानंतर एकाच ठिकाणी फार वेळ उभं राहून कंटाळा आला, मग संपूर्ण घरात हळूहळू  फेऱ्या मारून संवाद साधत होते.संवाद साधणारे आम्ही दोघीच होतो, मी आणि माझी मैत्रिण. तिचं म्हणणं मी शांतपणे ऐकत होते.मला वाटत होतं, आमच्यासोबत अजूनही कुणीतरी आमचं म्हणणं ऐकत होतं.कदाचित घरातल्या भिंती. मला असं वाटतं , घरातल्या भिंती या साक्षीदार असतात घरात घडणाऱ्या घटना, घरात येणारे पाहुणे मित्रमंडळी,कुटुंबातला संवाद, फोनवर होत असलेला संवाद हा त्या भिंतींमध्ये  तो रुजत असतो..घरातल्या भिंतींना आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचा आवाज, चेहरामोहरा परिचयाचा असतो.
एखादी व्यक्ती आपल्याला कॉल करायचं सोडून देते , आपल्या घरी येणं टाळते तेव्हा नात्याला तडा जावा तसंच घरातील भिंतींना तडे जातात.
काही घटनांचा विचार करून आपलं मन चटकन भरून येतं अगदी तसंच  त्या भिंतींचेही अचानक पापुद्रे निघतात.नकळतपणे भिंती आपल्या मनातला संघर्ष आपल्यासोबत संघर्ष जगतात..

आणि आपल्याला उगीच वाटतं घरातल्या भिंतींना जीव नसतो.
--प्रेरणा

#thoughts #yqbaba #yqtaai #yqdidi #diary #marathiquotes #aestheticthoughts