Nojoto: Largest Storytelling Platform

तू नेहमीच हुशार होतास आताही आहेसच फक्त असलेल्या ह

तू नेहमीच हुशार होतास आताही आहेसच 
फक्त असलेल्या हुषारीचा वापर नाही करता आला तुला तू नृत्य शिकलं, गायनात रस घेतो, तुला कुठलंही प्रकरण हाताळता येतं, स्वयंपाक सुद्धा बनवतोस , आणि वाचन लेखन देखील मन हरपून करतोस! पण यातल्या एकाला तरी कधी न्याय दिला आहेस का ? तुझ्या युद्धात कधीतरी 💯 उतरून बघितलं आहेस का ? इतकं सगळं केलंस पण काठावरून , दुरून ! 
पाण्यात पूर्णतः गेल्याशिवाय पोहता कसं येणार? पूर्ण दे ना तुझे प्रयत्न तुझ्या क्षमतांना! पूर्ण हो ना एकाच कामाचा एकाच वेळेस! आणि मग धरपकड सोडून दे ती नेहमी नेहमी होणारी तुझी ! आणि वरून फक्त म्हणतोस मला इतकं सगळं येतं पण यश का लाभत नाही हाताला!! आणि मग त्या नशिबाच्या शब्दचक्रात अडकून मरण पावते तुझी बुद्धी! तुझी कार्यकारण भाव समजून घेण्याची क्षमता ! आणि मग चिडून शिव्या घालतो तू त्या दैव आणि देवाला! पण त्याने तरी काय करायचे तू लढाई आधीच हत्यार टाकून दिले आहेस , नाउमेद अन निराशेचा सर्वोत्कृष्ट पुतळा बनणं तुला मान्य आहे लढाईत मानाने हरण्यापेक्षा!! #NojotoQuote