विरहात चांदण्यांच्या गोंदणात दिसतेस तू नाही म्हणू कशास दर्पणी त्या हसतेस तू नांदलीस झोपडीत या हाव ना महालाची महाल ही मग भग्न भासतो जेंव्हा नसतेस तू सावलीच माझी झाली अंधार झेला यला हा सांगितले मी उन्हाला त्यालाही पुरतेस तू रांधलेस किती कष्ट झिजली अशी दिन राती गंध केवडा हिरमुसला जेंव्हा खुलतेस तू रापले हे हात तुझे माझ्या कमनशिबी झळाने अंकुर पुन्हा नव्याने सूर्यात पेरलेस तू ©Shankar Kamble #गझल #गझले #गझलेची #तू #तू_आणि_मी #प्रेम #प्रेम #प्रेमकवि #FindingOneself