Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या आरश्यात तुला पाहिले मी तुझ्या लेखणीत मला वा

माझ्या आरश्यात तुला पाहिले मी
तुझ्या लेखणीत मला वाचले मी
तुझी साथ मजला देशील का रे
बेधुंद स्वप्नात तुला शोधले मी

जरी दुर कुठेही तू परदेशी
तुझी लेखनी यतसे मजपाशी
तुझी माझी सलगी होईल का रे
रेशमी नाते गुंफून हृदयाशी

तुझ्याचसाठी दिला एक सांगावा
पाहताच तूही का? नकार द्यावा
असे तुझे काव्य किती वाचले मी
प्रत्येक शब्द माझ्या ओठी रहावा

तुझे लिहिणे मज आवडे छान 
काव्यात तुझ्या जणू बहरे रान
इथे मोकळे होतेसे वेडे मन
हरित तृणांनी घ्यावे पांघरून

कसे सावरू रे मी माझ्या मनाला 
सांग कधी हे सारे कळेल तुला
तुझी लेखणी वाट पाहते आहे
कधी येईल मी ही तुझ्या भेटीला

                 ~ विलास भोईर 
                   ( .........तुझी लेखणी )

©Vilas Bhoir तुझी लेखणी...
माझ्या आरश्यात तुला पाहिले मी
तुझ्या लेखणीत मला वाचले मी
तुझी साथ मजला देशील का रे
बेधुंद स्वप्नात तुला शोधले मी

जरी दुर कुठेही तू परदेशी
तुझी लेखनी यतसे मजपाशी
तुझी माझी सलगी होईल का रे
रेशमी नाते गुंफून हृदयाशी

तुझ्याचसाठी दिला एक सांगावा
पाहताच तूही का? नकार द्यावा
असे तुझे काव्य किती वाचले मी
प्रत्येक शब्द माझ्या ओठी रहावा

तुझे लिहिणे मज आवडे छान 
काव्यात तुझ्या जणू बहरे रान
इथे मोकळे होतेसे वेडे मन
हरित तृणांनी घ्यावे पांघरून

कसे सावरू रे मी माझ्या मनाला 
सांग कधी हे सारे कळेल तुला
तुझी लेखणी वाट पाहते आहे
कधी येईल मी ही तुझ्या भेटीला

                 ~ विलास भोईर 
                   ( .........तुझी लेखणी )

©Vilas Bhoir तुझी लेखणी...
vilasbhoir5205

Vilas Bhoir

New Creator