Nojoto: Largest Storytelling Platform

इवलासा चिमुकला जीव त्यात माझा काय गुन्हा पाहायची

इवलासा चिमुकला जीव
त्यात माझा काय गुन्हा 
पाहायची होती सृष्टी सारी 
मानव जन्म देशील का? पुन्हा

अग्नितांडव कुठून आला 
ते काही मला माहित नाही 
पण माझ्या रडण्याणे 
कुणीच कसं जाग झालं नाही

नाव तर अतिदक्षता कक्ष
मग तिथे का नव्हता रक्षक
असतं तिथे कुणीतरी तर
अग्निचे नसतो आम्ही भक्षक

जन्मदात्री आई माझी
आज प्रश्न तरी कुठे मांडेल
कुणास ठाऊक पुन्हा तिला 
माझ्यासारखं बाळ मिळेल

हे देवा निष्पाप लेकरू मी
माझ्या माईला न्याय दे
डोळ्यात अनंदाश्रु म्हणून 
मानव रूपी पुन्हा जन्म दे

                    ~ कवी :  विलास भोईर
                     ( मानव जन्म देशील का? पुन्हा )

©Vilas Bhoir हरवलेली पाखरं
इवलासा चिमुकला जीव
त्यात माझा काय गुन्हा 
पाहायची होती सृष्टी सारी 
मानव जन्म देशील का? पुन्हा

अग्नितांडव कुठून आला 
ते काही मला माहित नाही 
पण माझ्या रडण्याणे 
कुणीच कसं जाग झालं नाही

नाव तर अतिदक्षता कक्ष
मग तिथे का नव्हता रक्षक
असतं तिथे कुणीतरी तर
अग्निचे नसतो आम्ही भक्षक

जन्मदात्री आई माझी
आज प्रश्न तरी कुठे मांडेल
कुणास ठाऊक पुन्हा तिला 
माझ्यासारखं बाळ मिळेल

हे देवा निष्पाप लेकरू मी
माझ्या माईला न्याय दे
डोळ्यात अनंदाश्रु म्हणून 
मानव रूपी पुन्हा जन्म दे

                    ~ कवी :  विलास भोईर
                     ( मानव जन्म देशील का? पुन्हा )

©Vilas Bhoir हरवलेली पाखरं
vilasbhoir5205

Vilas Bhoir

New Creator

हरवलेली पाखरं